एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिना पण काही महत्वाच्या गोष्टी या महिन्यात कराव्या लागतात तर जाणून घेऊ आणी आपल्या कॅलेंडर वर नोंद करू
नोकरदारांनी एप्रिल महिन्यात करायच्या गोष्टी..


- आपले आयकर विवरण आपल्या चार्टर्ट अकौटंट कढून करून घेणे


- नोकरदारांनी आपल्या कंपनीतून फॉर्म १६ अ व ब काढून घेणे


- पगारवाढ झाल्यास वाढीव पगारची SIP चालू करणे


-वाढीव पगारामुळे वाढणारा आयकर यावर तोडगा काढणे 




- कंपनीत बोनस भत्ता मिळत असल्यास जुने कर्ज किंवा क्रेडिट कार्ड किंवा सोने कर्ज भरून टाकणे जेणेकरून व्याजावर जाणारा खर्ज वाचेल


- मुलांच्या शाळा निवडणे व त्याचा प्रवेश निश्चित करणे


- नोकरी बदल करणार असाल तर एप्रिल मे नवीन कंपनीत जाऊन रुळण्यासाठी योग्य वेळ असते


- नवीन आर्थिक वर्षात कामास जोमात सुरुवात करणे जेणेकरून सुरुवातील घेतलेली आघाडी वर्षभर कायम राहते..



- आरोग्य विमा, वाहन विमा उतरविणे किंवा चालू असल्यास त्याचे हप्ते भरणे.


- कर्जखाते असल्यास त्यांची वार्षिक खाते उतारा काढून ठेवणे तसेच renewal किंवा दंड किंवा वार्षिक चार्जेस थकीत नसल्याची खात्री करणे.


- आपल्या स्थावर मालमत्तेची  नवीन कागदपत्रे /दाखले काढून त्यातील नावे बदल किंवा इतर हक्क याची खातरजमा करणे.


- मुलांच्या शाळेतील सुट्टीत सहल नियोजन करणे 
आणी सर्वात महत्वाचे आपले नविन आर्थिक वर्ष हे गतवर्षापेक्षा किमान १०% प्रगती साधनारे असावे असा प्रयत्न करणे..

---Credit Team Brainfryy @copyright----