आजच्या सुपरफास्ट युगात नोकरी करणे आणी आपला ताण तणाव (स्ट्रेस) यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले आहे , तर आज आपण जाणून घेऊ काही सोप्प्या गोष्टी ज्या तुमचा तणाव कमी करू शकता..



# वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळा.

बऱ्याच वेळा आपण माझेच बरोबर सिद्ध करण्यासाठी विनाकारण साहेबाबरोबर वाद घालतो व त्यामुळे दिवसभर आपल्या मनात राग व चिडचिड जागा घेते व आपला दिवस खराब होतो पण वास्तविकता पहिली तर माझेच बरोबर हे सिद्ध करूनही तुमची दैनंदिन कामात काहीच फरक पडणार नसतो त्यामुळे विनाकारण वाद टाळा.


# मी सोडून कोणी काम करत नाही हा अभिभाव (attitude) सोडणे.

आजकाल सर्वच कंपनी मध्ये प्रत्येकाची कामे एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे वेळेस काम न होने किंवा विलंब लागणे अशा गोष्टी होतात अशा वेळी फक्त मी किंवा माझेच डिपार्टमेंट काम करत बाकी सगळे आराम करतात असा अहमभाव बाळगू नये. 


# सहनशीलता वाढविणे

दैनंदिन कामकाजामध्ये वरिष्ठाकडून तुमच्याकडून असणारी अपेक्षेमुळे वाद किंवा काहीवेळा तुमच्या क्षमतेवर शंका घेणे यामुळे आपली चिडचिड होते तर थोड शांत डोक्याने विचार करा आणी अपेक्षा तर संपणार नाहीत पण सहन करायला शिका करण लवचिक झाडेच मोठ्या वादळत टिकतात.



याशिवाय खालील गोष्टी नियमित पाळा

थकवा टाळण्यासाठी दिवसभर नियमित ब्रेक घ्या
• कामाच्या कामांना प्राधान्य द्या आणि वास्तववादी ध्येये सेट करा
• वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक विचारांना खंडित करा
• योग, ध्यान किंवा मित्राशी बोलणे यासारख्या तणाव कमी करणाऱ्या क्रियाकलापांचा वापर करा
• नियमित व्यायाम करा आणि सकस आहार घ्या
• आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत घ्या