Brainfryy

ऊस तोडणी यंत्रावर 40 टक्के अनुदान | 40% subsidy on sugarcane harvester| maharashtra subsidy






महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांना ऊसतोड रानात आल्यावर होणारा आनंद म्हणजे एखादी लॉटरी जिंकल्या सारखा असतो. कारण तोड आपल्या वावरात येणे हेच मोठं दिव्य सध्या होऊन बसलेय, त्यात कोयता पूजन द्या पैसे, त्यांना नाश्ता चहा, वडापाव, मावा ही सगळी जुळणी सुद्धा शेतमालकानेच करावी लागते  यावर उपाय म्हणून शासनाने ऊसतोड यंत्राचा प्रसार करणेचे धोरण ठरविले आहे.


राज्यात दरवर्षी ऊसाच्या उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळ ऊसतोड कामगारांची देखील कमतरता भासत आहे


शासनाने आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे


साधारणत नवीन यंत्र ८५ लाख ते १ कोटी पर्यंत असते त्यामध्ये आता यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या किमान २० टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून आवश्यक आहे.


सदर अनुदानास व्यक्तिगत तसेच शेतकरी उत्पादक संस्था, खासगी आणि सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था पात्र आहेत.


वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. तर खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments