आजकाल कुठेही चहा घेताना एखाद्या हॉटेलवर जेवून बिल देताना किंवा छोटया मोठ्या दुकानात गेल्यावर MBA चा लोगो दिसतो तसेच  

*मराठा बिझनेस असोसिएशन*

*🙏🏻TEAM MBA🙏🏻*

*🚩सहकार्यातून 🤝 समृध्दीकडे🚩*  अशी टॅग लाइन दिसते  आणी प्रश्न पडतो नक्की हे MBA काय प्रकरण आहे चला तर आज जाणून घेऊ .


महाराष्ट्रात प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय उडूपी लोकांचा तर किराणा,सोनार मारवाडी समाजाचा तर फरशी टाईल्स पासून दाबेली आईस्क्रीम पर्यंत राजस्थानी लोकांचा तसेच वाहन व इलेक्ट्रिक मार्केट पंजाबी लोकांचा मग मराठा समाजाचे काय तर नोकरी हेच सर्वस्व मानून फक्त ऐका पिढीची सोय करून पुढच्या पिढीला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय न ठेवणाऱ्या समाजबंधवाना जागरूक करून त्यांना उद्योजक बनवणारी एक संस्था म्हणजे "मराठा बिझनेस असोसिएशन"


मराठा क्रांती मोर्चा नंतर एकवटलेल्या समाजाने आता व्यवसायात आपला ठसा उमटवला पाहिजे या हेतूने १ जानेवरी २०२१ ला या संघटनेची सुरुवात झाली.

आता दुसरा प्रश्न पडतो हे सगळं कोण चालवत ? याला काही राजकीय पाठबळ?

तर मित्रहो ही संघटना निस्वार्थ वृत्तीने काम करणारे काही युवा वर्ग आपला व्यवसाय नोकरी सांभाळून संघटना वाढवताहेत आहे आणी सध्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा मध्ये त्यांची स्वतंत्र  कार्यकारनी आहे. आणी हो यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही.


अजून मग आणखी एक प्रश्न हे नक्की काय काम करतात.

-मराठा समाजतील होतकरू तरुणांना व्यवसाय करण्यासाठी चालना देणे

- काही जेष्ठ उद्योजकडून नवीन तरुणांना मार्गदर्शन तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या ओळखी करून देणे

- व्यवसाय शिकण्यासाठी एखाद्या चालू उद्योगामध्ये काम करण्याची संधी देणे

- नव उद्योजकाच्या व्यवसायाची फेसबुक , व्हाट्सअँप वर जाहिरात करणे

-प्रत्येक शहरात व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर घेणे 

-उद्योगासाठी कर्ज प्रकरण /शासकीय अनुदान किंवा सबसिडी यासाठी मदत करणे


मग आता मुद्द्याचा प्रश्न यासाठी भांडवल कुठून येते?


तर सदर गोष्टीसाठी सदर पदाधिकारी पदरमोड करून हे चालवतात तसेच आपल्या बांधवांच्या मदती साठी प्रसंगी आर्थिक पाठबळ सुद्धा उभा करतात...