मित्रानो उन्हाळा सुरु झाला, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या पण सध्याची लहान किंवा किशोर मुल काय करतात हे पाहून आपले लहानपण आठवते ज्यांचे बालपण ९० च्या दशकात (Sweet 90's kid)  गेले त्यांच्या आठवणीबरोबर थोडी तुलनात्मक उजळणी करून पाहूया...


सध्याची मुल आपला बहुतांश वेळ टीव्हि किंवा मोबाईल समोर घालवतात.



पूर्वी सुट्टीत मुलांना आपल्या मित्रात रात्रदिवस वेळ घालवायला आवडायचे.

मग सकाळी सुरुवात व्हायची    क्रिकेट, विटी दांडू तसेच इतर मैदानी खेळांनी. त्यानंतर ठरलेली ती विहीर किंवा नदीवर अंघोळ मग त्यानंतरी लागणारी कचकचाटून भूक मग दुपारी आवर्जून वाचला जाणारा तो पेपर (वर्तमानपत्र) त्यातही सिनेतारका व खेळ यावर आधारित शेवटची दोन पाने, मग दुपार सत्रात बैठे खेळ जसे की नवा व्यापार ज्यात उशिरा येणारा नेहमी बँकवाला बनायचा किंवा करम नाहीतर बुद्धिबळ आणी नाही म्हंटल तरी ९० च्या काळात पत्ते खेळण पण वर्जित नव्हते... नंतर ऊन कमी झाल की पुन्हा मैदान मग थोडा अंधार पडला की लपनडावं ज्यात लपयाचं क्षेत्र २-३ गल्ल्या सहज असायचं आणी रात्री जेवण करून कट्ट्यावर गप्पा या बालपणाला तोडच नव्हती...



सध्या लहान मुल सुट्टीत समर कॅम्प ला जातात किंवा एखाद्या क्रिकेट किंवा इतर खेळाच्या अकादमी ला जातात पण ९० च्या काळात मुलाच परीक्षा चालू असतानाच अभ्यासाचं जितकं पक्क नसेल त्यापेक्षा जास्त व्यवस्तीत मामाकडे किती दिवस मग मावशीकडे कधी जायचं याचं टाईमटेबल पक्क असायचं.अगदी आपल्या घरी कोण कधी येणार हेसुद्धा....



आताची मुल सुट्टीत ऑनलाईन डान्स क्लास किंवा चित्रकला कोर्स चालू करतात. पण ९० च्या काळात गल्ली गल्लीनुसार क्रिकेट स्पर्धा , बॅडमिनटन स्पर्धा आयोजित केल्या जायच्या अगदी ५०रुपये बक्षीस पण खूप मोठ वाटायचं.

आता पालक मुलांना सुट्टीत हॉटेल कॅफे येथे जेवायला नेतात पूर्वी ऐकत्र कुटुंबात आमरस पार्टी चिकन पार्टी यात खूप गंम्मत असायची




आता पाहूया सध्याच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी येथे काही सर्वोत्तम योजना आहेत:

 1. प्रवास: नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे, नवीन संस्कृतींचा अनुभव घेणे आणि नवीन पाककृती वापरून पाहणे हा उन्हाळी सुट्टी घालवण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.  रोड ट्रिप, कॅम्पिंग किंवा राष्ट्रीय उद्यानांना भेट देणे असो, प्रवास हा एक समृद्ध करणारा अनुभव असू शकतो.



 2. उन्हाळी शिबिरांना उपस्थित राहा: मुलांसाठी नवीन कौशल्ये शिकण्याचा, नवीन मित्र बनवण्याचा आणि मजा करण्याचा उन्हाळी शिबिरे हा एक उत्तम मार्ग असू शकतो.  क्रीडा आणि साहसी शिबिरांपासून ते कला आणि हस्तकला शिबिरांपर्यंत, निवडण्यासाठी अनेक प्रकारचे उन्हाळी शिबिरे आहेत.



 3. स्वयंसेवक: मौल्यवान अनुभव आणि नवीन कौशल्ये मिळवताना स्थानिक धर्मादाय संस्था, प्राणी आश्रयस्थान किंवा समुदाय केंद्रांमध्ये स्वयंसेवा करणे हा समुदायाला परत देण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो.



 4. नवीन कौशल्य शिका: स्वयंपाक, छायाचित्रण, चित्रकला किंवा नवीन वाद्य वाजवणे यासारखी नवीन कौशल्ये शिकण्यासाठी उन्हाळी सुट्टी हा एक योग्य वेळ आहे.



 5. आराम करा आणि आराम करा: कधीकधी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सर्वोत्तम योजना म्हणजे फक्त आराम करणे आणि आराम करणे.  कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे, एखादे चांगले पुस्तक वाचणे किंवा शांतपणे फिरणे असो, रिचार्ज करण्यासाठी वेळ काढणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.